शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी करणारा वासनांध बँक अधिकारी निलंबीत 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 जून 2018

बुलडाणा जिल्ह्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाने, पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीशी अश्लील संभाषण केल्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. 

याप्रकरणी मॅनेजर राजेश हिवसे आणि शिपाई मनोज चव्हाण यांना तात्काळ निलंबित केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ निरुपमा डांगे यानी दिली​. दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधातील हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी निरुपमा डांगे यांनी दिली. 

शेतकरी आणि त्याची पत्नी पीककर्जासाठी दाताळातल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या. तिथं बँक मॅनेजरने कागदपत्रांची चाळणी करुन तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना केली.

 त्यावर संबंधित शेतकऱ्यानं त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. नंतर मॅनेजरने शेतकरी पत्नीसोबत अश्लील संभाषण करत त्यांना शरीरसुखाची मागणी केली होती. तसंच मोबदल्यात पीककर्जासोबत वेगळं पॅकेजही देण्यात येईल, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठवला होता.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live