मुलाला वाचवताना आई पाण्यात पडली अन् यांना वाचवण्यासाठी बापानेही उडी मारली; हे घडलं फक्त सेल्फीमुळे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

सेल्फी काढण्याचे नादात खिरोडा पूर्णेच्या पात्रात मुलासह नवरा बायको पुरात वाहून गेल्याची घटना आज 22 ऑगस्टचे सायंकाळी 5 वाजताचे दरम्यान घडली. 

प्राप्त माहितीनुसार आज सायंकाळी मुलासह नवरा बायको खिरोडा येथील पूर्णेच्या नवीन पुलाखाली गेले होते. लहान मुलगा सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसरल्याने तो पुराचे पाण्यात वाहून जाताना दिसताच त्याचे आईने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता ती पण पाण्यात घसरली.

दोघे माय लेक वाहत असल्याचे पाहून बापानेही पात्रात धाव घेतली आणि तेही पाण्यात वाहत गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती समजताच खिरोडा येथील लोकांनी पुलाकडे धाव घेतली. नदीला मोठा पूर आलेला असून पुलाचे 10 फूट खाली पाणी वाहत आहे. पुलावर वाहून गेलेल्या व्यक्तीची बाईक उभी असून पोलिस माहिती काढत आहेत. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live