शौचालयाच्या टाकीत पडला रेडा; रेड्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 मे 2019

सावंतवाडी : नरेंद्र डोंगर परिसरातील शौचालयाच्या टाकीत पडलेल्या रेड्याला बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले आहे. जेसीबीच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले. यावेळी घटनास्थळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, सुरेंद्र बांदेकर यांनी भेट दिली व मदत कार्यात सहभाग घेतला होता. गव्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मोतीमहल या वसाहतीत असलेल्या शौचालयाच्या टाकीत रात्री हा रेडा पडला होता. हा प्रकार कळल्यानंतर नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले होते. त्यानंतर तीन तास रेड्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते. शौचालयाची टाकी फोडून त्याला बाहेर काढण्यात आले.   

रेड्याला किरकोळ जखमा झाल्या होत्या. तशाच अवस्थेत तो उठून नरेंद्र डोंगराच्या बाजूने मार्गस्थ झाला. यावेळी वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे, वनपाल प्रमोद राणे, अमित खटके, वनरक्षक प्रमोद जगताप, विश्वनाथ माळी, चंद्रिका लोहार, अशोक गावडे, वनमजूर बबन रेडकर आदी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या मदत कार्यात सहभाग घेतला होता.

Web Title: marathi news bull fell into drainage tank in sawantwadi rescued by forest department

संबंधित बातम्या

Saam TV Live