(VIDEO) अपघातग्रस्त बसचा सांगाडा काढण्यासाठी महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

पोलादपूर घाटात झालेल्या बस दुर्घटनेतली बस आज बाहेर काढली जाणार आहे. त्यामुळे महाबळेश्वर ते पोलादपूर मार्ग आज वाहतुकीसाठी 8 तासांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. 28 जुलै 2018 रोजी दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापिठाचे कर्मचारी, वीकएन्डसाठी बसने महाबळेश्वरला सहलीसाठी निघाले होते. त्यावेळी पोलादपूर तालुक्यातील दाभिळ आणि आंबेमाची गावालगतच्या दरीमध्ये त्यांची बस कोसळून 30 प्रवासी दगावले होते. या अपघाताची कसून चौकशी करण्यासाठी ही बस बाहेर काढण्यात येणार आहे. बसच्या स्टिअरिंगवरील बोटाचे ठसे मिळवण्याचा देखील प्रयत्न तपास यंत्रणांकडून केला जाणार आहे. 

WebTitle : marathi news bus ambenali ghat bus accident bus debris to be taken out from valley 

संबंधित बातम्या

Saam TV Live