राज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारासाठी आता एप्रिल महिन्याचा मुहूर्त

राज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारासाठी आता एप्रिल महिन्याचा मुहूर्त

राज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारासाठी आता एप्रिल महिन्याचा मुहूर्त काढण्यात आला आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर दिली. केंद्र व राज्यातील भाजपा प्रणीत सरकार आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीचा हा कदाचित शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असेल. मंत्रिमंडळात या वेळी आणखी तीन मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना संधी मिळू शकते. जागावाटपानुसार भाजपाकडे 30 तर शिवसेनेकडे 12 मंत्रीपदे येतात. त्यापैकी शिवसेनेने आपला कोटा यापूर्वीच भरला आहे, त्यामुळे हा विस्तार फक्त भाजपाचाच असेल. त्यात एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com