नव्या सरकारचं खातेवाटप असं असण्याची शक्यता

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 11 डिसेंबर 2019

मुंबई : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन आता बरेच दिवस होत आलेत. मात्र अजुनही खातेवाटपाचा तिढा काही सुटत नव्हता. मात्र आता खातेवाटपाबाबत ेकदाचा निर्णय झालेला दिसतोय.

महाविकास आघाडीतलं खातेवाटप फायनल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुणाच्या खात्याला कोणतं खातं जाणार, हे साम टीव्हीच्या हाती लागलंय.

असं असेल खातेवाटप

मुंबई : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन आता बरेच दिवस होत आलेत. मात्र अजुनही खातेवाटपाचा तिढा काही सुटत नव्हता. मात्र आता खातेवाटपाबाबत ेकदाचा निर्णय झालेला दिसतोय.

महाविकास आघाडीतलं खातेवाटप फायनल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कुणाच्या खात्याला कोणतं खातं जाणार, हे साम टीव्हीच्या हाती लागलंय.

असं असेल खातेवाटप

महाविकास आघाडी सरकारमध्ये गृह आणि नगरविकास ही महत्त्वाची खाती शिवसेनेकडे, तर गृहनिर्माण आणि अर्थ ही खाती राष्ट्रवादीकडे असणार आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणारे. दरम्यान काँग्रेसला कोणती खाती मिळणार हे अजून कळू शकलेलं नाही. तसंच इतर मंत्रिमंडळासंदर्भात अधिकृत घोषणा कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे आणि इतर सहा मंत्र्यांचा शपथविधी होऊन इतके दिवस उलटले. मात्र बरेच दिवस हा तिढा कायम होता.

 • शिवसेना
 •  गृह
 •  नगरविकास
 •  परिवहन
 •  उद्योग
 •  सामाजिक न्याय
 •  पर्यावरण
 •  उच्च व तंत्रशिक्षण
 • राष्ट्रवादी काँग्रेस
 •  वित्त आणि नियोजन
 •  गृहनिर्माण
 •  कृषी
 •  सार्वजनिक आरोग्य
 •  सहकार
 •  सार्वजनिक बांधकाम
 • काँग्रेस
 •  महसूल
 •  ऊर्जा
 •  जलसंपदा
 •  आदिवासी विकास
 •  वैदकीय शिक्षण
 •  शालेय शिक्षण
 •  महिला व बालकल्याण

दरम्यान, उद्धव ठाकरे सरकारच्या लांबत असलेल्या खातेवाटपाच्या घोळावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी टीकास्त्र सोडलं होतं. मलाईदार खात्यांसाठी मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरू आहे का...? असा सवाल अण्णांनी विचारला होता. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही अण्णांनी काल केली होती.

 

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

Web Title - cabinet expansion solved


संबंधित बातम्या

Saam TV Live