VEDIO | मंत्रिमंडळाबाबत आमचं ठरलंय? 'या' नेत्यांना मिळणार 'ही' खाती

VEDIO | मंत्रिमंडळाबाबत आमचं ठरलंय? 'या' नेत्यांना मिळणार 'ही' खाती

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात कोण कोण असतील यावरून अनेक चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्रिपदाचा वाद वगळता इतर सर्व मंत्रिपदावरून तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचं समजतंय...पाहा या संदर्भातील सविस्तर विश्लेषण...

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर सगळ्यांनाच उत्सुकता लागलीय ती खातेवाटपाची...महत्वाची खाती आपल्या ताब्यात असावी यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील होते. मात्र आता तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटपावरून सहमती झाल्याचं दिसून येतंय. 

सुत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसला महसूल, सार्वजनिक बांधकाम, उत्पादन शुल्क खातं मिळू शकतं. तर राष्ट्रवादीला गृह, अर्थ, पर्यावरण आणि वनमंत्रालयाचा कारभार मिळू शकतो. शिवसेनेला नगरविकास, जलसंपदा, गृहनिर्माण आणि परिवहन मंत्रिपद मिळू शकतं. 

अर्थात असं असलं तरी उपमुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये कुरबुरी सुरूच आहे. उपमुख्यमंत्रिपद अजित पवारांना मिळावं यासाठी राष्ट्रवादीतील एक मोठा गट आग्रही आहे. तर काँग्रेसलाही हे पद हवंय. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदावरून तिन्ही पक्ष नेमका काय तोडगा काढतात यावरून सर्वांनाच उत्सुकता लागलीय. 

Web Title - cabinet of mahavikas aghadi decided

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com