राज ठाकरेंवर गुलाबराव पाटलांची जहरी टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 जानेवारी 2020

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडं फक्त ठाकरे आडनावाचं वलय आहे. हे आडनाव नसतं तर ते संगीतकार झाले असते, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडं फक्त ठाकरे आडनावाचं वलय आहे. हे आडनाव नसतं तर ते संगीतकार झाले असते, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

विधानसभा निवडणुकीत नाशिक महानगरपालिकेचे शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देत मनसेकडून निवडणूक लढवली होती, त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. यासाठी मनसे, भाजपा आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत होत असून यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकर जाधव यांच्या प्रचारासाठी गुलाबराव पाटील नाशिकमध्ये आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

गुलाबराव पाटील म्हणाले, 'बाळासाहेबांना ज्यांनी धोका दिला त्यांचा सत्यानाश झाला. बाळासाहेब आणि शिवसेनेमुळे एक पानवाला आज कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोहोचला. मात्र, मनसे कुठे आहे. मनसेबरोबरच या निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपवरही पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले, भाजपा आमच्या जीवावर वाढली आणि आता ते आमच्यावरच टीका करत आहे. भाजपला सत्तेसाठी पीडीपी, नितीशकुमार, रामविलास पासवान हे चालतात आणि आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेलो तर ते चालत नाही.

Web Title: Shivsena Minister Gulabrao Patil Slammed MNS Chief Raj Thackeray

 


संबंधित बातम्या

Saam TV Live