बॅंक संघटनांची संपाची हाक

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 जानेवारी 2020

देशभरात 31 जानेवारी, 1 फेब्रुवारीला काम बंद 
नवी दिल्ली - बॅंक कर्मचारी संघटनांनी 31 जानेवारीपासून देशव्यापी दोनदिवसीय संपाची हाक दिली आहे. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला हा संप पुकारण्यात आला आहे. 

देशभरात 31 जानेवारी, 1 फेब्रुवारीला काम बंद 
नवी दिल्ली - बॅंक कर्मचारी संघटनांनी 31 जानेवारीपासून देशव्यापी दोनदिवसीय संपाची हाक दिली आहे. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला हा संप पुकारण्यात आला आहे. 

'इंडियन बॅंक्‍स असोसिएशन'(आयबीए) आणि सरकारबरोबर वेतनवाढीसंदर्भात सुरू असलेली बोलणी फिस्कटल्यानंतर बॅंक कर्मचारी संघटनांनी पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून सरकारच्या बॅंकांचे विलीनीकरण करण्याच्या धोरणाविरोधात आणि वेतनाच्या प्रश्‍नांसंदर्भात बॅंक कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याशिवाय नऊ बॅंक कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, द युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सनेसुद्धा (यूएफबीयू) 11 ते 13 मार्चदरम्यान तीन दिवसांचा संप पुकारणार असल्याचे सांगितले आहे."1 एप्रिलपासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत. वेतनात किमान 15 टक्‍क्‍यांनी वाढ करण्याची "यूएफबीयू'ची मागणी आहे. मात्र "आयबीए'ने ही मागणी 12.25 टक्‍क्‍यांवर आणली आहे. आम्हाला हे मान्य नाही', अशी माहिती "यूएफबीयू'चे राज्य समन्वयक सिद्धार्थ खान यांनी दिली. वेतनवाढीसंबंधीची शेवटची बैठक 13 जानेवारीला पार पडली आहे.

Web Title call strike bank associations


संबंधित बातम्या

Saam TV Live