पाण्यासाठी 10 हजार उंटांचा जीव घेणार?

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 9 जानेवारी 2020

ऑस्ट्रेलियातल्या वणव्यात 50 कोटीहून अधिक मुक्या प्राण्यांचा जीव गेलाय. अशातच एक धक्कादायक बातमी येतीय ती म्हणजे इथं एक दोन नव्हे तर तब्बल 10 हजार उंटांना ठार केलं जाणारंय. काय आहे त्यामागचं कारण, काय आहे तुम्हीच पाहा...

ऑस्ट्रेलियातल्या वणव्यात 50 कोटीहून अधिक मुक्या प्राण्यांचा जीव गेलाय. अशातच एक धक्कादायक बातमी येतीय ती म्हणजे इथं एक दोन नव्हे तर तब्बल 10 हजार उंटांना ठार केलं जाणारंय. काय आहे त्यामागचं कारण, काय आहे तुम्हीच पाहा...

उंट म्हणजे उपयोगी पडणारा प्राणी...उंटांनी कुणाला उपद्रव केल्याचं फारसं ऐकिवात नाही. पण ऑस्ट्रेलियाचं सरकार याच उंटांच्या जिवावर उठलंय. दक्षिण ऑस्ट्रेलियात 10 हजार उंटांना गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय. उंटांना मारण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारनं एक अभियानच हाती घेतलंय. या अभियानासाठी सरकारकडून हेलिकॉप्टरही पाठविण्यात आले आहेत.

बरं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल या उंटांचा गुन्हा काय? तर त्यांचा गुन्हा आहे पाणी...होय, पाणी कमी पडत असल्यानं सरकारनं या उंटांना गोळ्या झाड़ण्याचे आदेश दिलेत. 

दक्षिण ऑस्ट्रेलियातील काही गावातील पाणवठ्यावरचं सर्व पाणी उंट संपवत असल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. उंटांना प्यायला भरपूर पाणी लागतं म्हणून ते येऊन भरपूर पाणी पिऊन जातात. पाणी संपल्यामुळे हे उंट आता दारावर, कुंपणांवर धडका मारून स्थानिकांना त्रास देत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे सरकारनं हे टोकाचं पाऊल उचललंय. 

खरं तर आधीच ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स मध्ये जंगलाला लागलेल्या भीषण वणव्यात तब्बल 50 कोटीहून अधिक मुक्या प्राण्यांचा जीव गेला. या प्राण्यांना वाचवण्यासाठी वन्यप्रेमींनी अटोकाट प्रयत्न केले. काही प्राण्यांचे जीव वाचवण्यात ते यशस्वीही झाले. असं असताना दुसरीकडे उंटाचा जीव घेण्याचा आदेश काढणं कितपत योग्य आहे. या उंटाना इतरत्र स्थालांतरित करूनही प्रश्न सुटू शकतो. मग ऑस्ट्रेलिया सरकारला इतकी घाई कशाची? 

Web Title - camel killed in south austrelia for water 


संबंधित बातम्या

Saam TV Live