आता ऑनलाईन खरेदी करता येणार, एमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील 20 एप्रिलपासून सुरु

साम टीव्ही
शुक्रवार, 17 एप्रिल 2020
  • ई-कॉमर्स कंपन्यांना सरकारचा मोठा दिलासा
  • सोमवारपासून ऑनलाईन खरेदी करता येणार
  • हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणीच डिलीव्हरी करणार
  • परवागीनंतरच वाहनांना ये-जा करता येणार

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्येही एक दिलाादायक बाब समोर येतेय. ती म्हणजे आता ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. 

कोरोनाचा संसर्ग नसलेल्या भागात २० एप्रिलपासून बाजारपेठा सुरू करण्याबाबत गुरुवारी गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार सोमवारपासून एमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील सारख्या ई कॉमर्स कंपन्या मोबाइल तसेच फ्रिज, टीव्ही, लॅपटॉप, एसी, कुलर इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू, तयार कपडे आणि शाळकरी मुलांसाठी स्टेशनरी विकू शकतील.

दरम्यान, देशव्यापी लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम आता दिसण्यास सुरुवात झाली आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये हळूहळू घट होऊ लागली आहे. विशेष म्हणजे आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्याही वाढतेय. आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. मागील 24 तासांत 941 नव्या रुग्णांची नोंद झाली असून त्यापूर्वीच्या 24 तासांत हा आकडा 1 हजार 76 वर होता. तर पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्याही अडीचशेच्या वर गेली आहे. 
मागली 14 दिवसांत देशातल्या एकूण 325 जिल्ह्यांत एकही रुग्ण आढळलेलना नाहीये. 13 ते १५ एप्रिलच्या तुलनेत रुग्णसंख्येत कमालीची घट पाहायला मिळतेय. त्यामुळेच ऑनलाईन खरेदी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

स्थानिक बाजारपेठांत मात्र या वस्तूंची दुकाने उघडणार नाहीत. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी बुधवारी ३ मे पर्यंत लॉकडाऊन कालावधीबाबत सुधारीत निर्देश जाहीर केल्याच्या दुसऱ्या दिवशी हा निर्णय झाला. या निर्देशांमध्ये ई-कॉमर्स कंपन्या आणि कुरिअर कंपन्यांना २० एप्रिलपासून काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. ताज्या खुलाशात म्हटले आहे की, ई कॉमर्स कंपन्यांची वाहने संबंधित प्राधिकरणाच्या परवानगी नंतरच ये- जा करू शकतील. ही सूट केवळ कोरोनाचा हॉटस्पॉट नसलेल्या भागातच देण्यात येईल.

Web Title - marathi news Can be purchased online now, Amazon, Flipkart, Snapdeal starting April 20


संबंधित बातम्या

Saam TV Live