आता जीएसटीची वसुली दोन करटप्प्यात (स्लॅब) करणे शक्य- अरुण जेटली

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 1 जुलै 2019

वस्तू व सेवा कराच्या GST अंमलबजाणीनंतर केंद्र सरकारच्या महसुलात वाढ झाल्यामुळे आता जीएसटीची वसुली दोन करटप्प्यात (स्लॅब) करणे शक्य असल्याचे माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटले आहे. मात्र, याचवेळी जीएसटीसाठी एकच करटप्पा अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या देशांमध्ये गरिबीच नसते, तिथेच एका टप्प्यात जीएसटी वसुली करणे शक्य असते, असे त्यांनी म्हटले आहे.

जीएसटीच्या अंमलबजावणीला सोमवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. अरूण जेटली यांच्या नेतृत्त्वामध्येच देशात जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर ब्लॉगच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका मांडली. अरूण जेटली म्हणाले, जीएसटीमुळे सरकारच्या महसुलात भविष्यात वाढ होणार आहे. त्यामुळे जीएसटी वसुलीचा १२ आणि १८ टक्क्यांचा टप्पा एकत्र करण्याचा निर्णय घेणे शक्य होईल. त्यानंतर जीएसटीमध्ये केवळ दोनच टप्पे असतील, असे त्यांनी म्हटले आहे.

१ जुलै २०१७ रोजी जीएसटीची अंमलबजावणी देशात सुरू झाली होती. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये अरूण जेटली यांनी प्रकृतीच्या कारणामुळे मंत्रिमंडळात सहभाग घेतला नव्हता. सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच अरूण जेटली यांनी हा ब्लॉग लिहिला आहे. याआधी त्यांनी एक्झिट पोल्सवर आधारित ब्लॉग लिहिला होता.

अरूण जेटली म्हणाले, ज्या देशांमध्ये गरिबीच्या रेषेखाली राहणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते, तिथे एकाच दराने जीएसटीची आकारणी करणे अशक्य असते. जीएसटीच्या अंमलबजावणीपूर्वी वेगवेगळ्या वस्तूंवर गरिब आणि श्रीमंत एकसारखाच कर भरीत होते. एकापेक्षा जास्त टप्प्याने जीएसटीची अंमलबजावणी करण्यामुळे सर्वसामान्य लोकांकडून वापरण्यात येणाऱ्या वस्तूंवर जास्त कर लावला जावू नये, याची काळजी घेणे शक्य होते, असे त्यांनी म्हटले 

Web title: Can have 2 rates as revenue increases says Arun Jaitley on 2 years of GST

संबंधित बातम्या

Saam TV Live