विधान परिषदेसाठी सेनेकडून उद्धव ठाकरे आणि निलम  गोर्हे यांची उमेदवारी निश्चित

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 मे 2020

शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे आणि निलम  गोर्हे यांची उमेदवारी निश्चित झालीय. 11 मे पुर्वीच उद्धव ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याचं समजतंय.

शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे आणि निलम  गोर्हे यांची उमेदवारी निश्चित झालीय. 11 मे पुर्वीच उद्धव ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याचं समजतंय. उद्धव ठाकरेंचा आमदारकी अर्ज भरण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची लगबग सुरू झालीय.

मुंबई, ठाणे आणि रायगडमधील शिवसेनेच्या आमदारांच्या सह्या उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारी अर्जावर घेण्यात आल्यात. येत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी ही निवडणुक पार पडणार आहे.

अर्थसंकल्पांना थेट मंजुरी देण्याचा निर्णय

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या अर्थसंकल्पांना थेट मंजुरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिलीय. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या अर्थसंकल्पीय सभा कोरोनामुळे रद्द झाल्या होत्या.

बजेट मीटिंगच न झाल्याने निधी खर्च करण्यात अडचणी येत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा परिषदेची बजेट मीटिंग न झाल्यास अर्थसंकल्पाला मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले जातात. मात्र, लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याने आता जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या बजेटला सरकारची मंजुरी घ्यावी लागणार आहे.

मात्र राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने ज्या जिल्हा परिषदांमध्ये सरकारच्या योजनांचा निधी मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहात आहे, अशा योजनांच्या निधीला कात्री लावण्याचं नियोजन सरकारने केलंय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live