'कॅपिटल फर्स्ट'कडून कर्मचाऱ्यांना 20 कोटी रुपयांचे शेअर 'भेट'

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

मुंबई : 'कॅपिटल फर्स्ट'चे अध्यक्ष व्ही वैद्यनाथन यांनी आपल्या कंपनीच्या आजी-माजी सहकाऱ्यांना नुकतेच 20 कोटी रुपयांचे शेअर्स भेट म्हणून दिले आहेत. कंपनीला मोठं करण्यात ज्या-ज्या सहकाऱ्यांनी मदत केली, कष्ट सोसले, त्या सगळ्यांची नावं कृतज्ञतापूर्वक नोंदवत, आपण हे शेअर्स त्यांना भेट स्वरूपात देत असल्याचे वैद्यनाथन यांनी मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.  

आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजारात कॅपिटल फर्स्टचा शेअर 478.15 रुपयांवर व्यवहार करतो आहे. कॅपिटल फर्स्टची 2010 मध्ये स्थापना झाली होती. त्यांनतर आतापर्यंत ज्या-ज्या सहकाऱ्यांनी कंपनीसाठी मेहनत घेतली. त्यांना एकूण 4,29,000 शेअरचे म्हणजे 20 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स देऊ केले आहेत. वैद्यनाथन यांच्याकडे कंपनीचे एकूण 40,40,576 शेअर आहेत. त्यापैकी 4,29,000 शेअर त्यांनी आपले 26 सहकारी, 11 नातेवाईक आणि एक वैयक्तिक ड्रायव्हर यांना भेट म्हणून दिले आहेत.

वैद्यनाथन यांनी प्रत्येकाला 11 हजार (51 कोटी रुपये) शेअर भेट दिले आहेत. तर ड्रायव्हरला 6,500 (31 लाख रुपये) शेअर दिले आहेत.  वैद्यनाथन यांनी सहकाऱ्यांना एकूण 2,86,000, नातलगांना 1,10,500 आणि ड्रायव्हरला 6,500 शेअर दिले आहेत. 

WebTitle : marathi news capital first company issues shares to its employees  as diwali gift 

संबंधित बातम्या

Saam TV Live