पुणे-बंगळुरू महामार्गावरील जांभुळवाडी येथील नियंत्रण सुटल्याने पुलावरून कार कोसळली खाली .

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 20 एप्रिल 2019

पुणे : भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे-बंगळुरू महामार्गावरील जांभुळवाडी येथील पुलावरून तब्बल दिडशे फुट उंचावरुन कार खाली कोसळली. अपघाताच्यावेळी कारमधील एअर बॅग तत्काळ उघडल्याने सुदैवाने चालकासह दोघेजण थोड्यात बचावले. ही घटना शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. 

पुणे : भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे-बंगळुरू महामार्गावरील जांभुळवाडी येथील पुलावरून तब्बल दिडशे फुट उंचावरुन कार खाली कोसळली. अपघाताच्यावेळी कारमधील एअर बॅग तत्काळ उघडल्याने सुदैवाने चालकासह दोघेजण थोड्यात बचावले. ही घटना शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. 

पुणे बंगळुरू महामार्गावरुन मारुती नेक्‍सा ही कार सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या दिशेने येत होते. कार कात्रज येथील जांभुळवाडीजवळील दरीपुलाजवळ आली. त्यामुळे वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार पुलाच्या कठड्यास धडकून दिडशे फुट खोल दरीत खाली पडली. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर कारमध्ये असणाऱ्या दोघांना रहिवाशांनी तत्काळ बाहेर काढले. दोघांच्या पायांना मोठ्या प्रमाणात मार बसला. तर कारमध्ये एअरबॅगमुळे दोघांच्याही डोक्‍यास किंवा शरीराच्या अन्य भागास गंभीर दुखापत झाली नाही. अग्निशामक दल व पोलिस घटनास्थळी पोहचेपर्यंत नागरीकांनी जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केले, अशी माहिती अग्निशामक दलाच्यावतीने देण्यात आली. 

अपघात झालेली कारचा चालक व त्याच्या शेजारील सीट भाग वगळता, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारचे चारही दरवाजे, पाठीमागील बाजु पुर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहे. 

कारमध्ये डॉक्‍टरचे स्टेथस्कोप 
''कारमधील व्यक्ती कोण होत्या, त्यांची नावे काय आहेत, याविषयी माहिती मिळू शकली नाही. मात्र कारमध्ये डॉक्‍टरांकडून रुग्णांना तपासण्यासाठी वापरले जाणारे स्टेथस्कोप आढळून आले. त्यामुळे ही कार एखाद्या डॉक्‍टरची असण्याची शक्‍यता नागरिकांनी व्यक्त केली.

Web Title: car collapse from bridge at Jambhulwadi; Two injured
 


संबंधित बातम्या

Saam TV Live