ना पेट्रोल, ना डिझेल आता बिअरवर चालणार कार ?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

लवकरच आता तुमची कार बिअरवरही धावू शकेल. हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला ना?  पण, हो आता हे शक्य असल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओतून करण्यात आलाय. बिअरपासून इंधन बनवण्यात संशोधकांना यश आल्याचं सांगितलं जातंय. आता या व्हायरल मेसेजमध्ये काय लिहिलंय पाहा.

2022 सालापर्यंत हे शक्य होईल असा दावा संशोधकांनी केलाय. पण, हे कसं काय शक्य आहे. बिअरवर कार चालवू शकतो का? याआधी पाण्यावर, बॅटरीवर कार चालू शकते हे माहित होतं. त्याचा खर्चही परवडणारा आहे.

मात्र,  हा प्रयोग थोडा खर्चिक असल्यानं हे कशासाठी हाही प्रश्न आम्हाला पडला. त्यामुळं याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. याबद्दल अधिक माहिती ऑटो एक्सपर्ट देऊ शकतात. त्यामुळं आमचे प्रतिनिधी संजय डाफ हे ऑटो एक्सपर्ट प्रोफेसर श्याम सुंदर भोगा यांना भेटले. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि खरंच बिअरवर कार चालवणं शक्य आहे का हे जाणून घेतलं.

बियरमध्येच नव्हे तर अल्कोहोलमध्ये असलेल्या इथेनॉलला ब्यूटेनॉलमध्ये बदलून त्यापासून कार चालवण्यात शक्य असल्याचं स्पष्ट झालं. पण, ते कितपत योग्य आहे.? हा प्रयोग सामान्यांना परवडणारा आहे का.? त्यापासून काही प्रदुषण होऊ शकतं का? हेदेखील आम्ही जाणून घेतलं.

बिअरवरच नव्हे तर अल्कोहोलमध्ये इथेनॉल असल्यानं त्यापासून कार चालवणं शक्य आहे. पण, ते खर्चिक असून, त्याचा तोटाही होऊ शकतो. गाडीचं नुकसानही होऊ शकतं. ऐकायला जरी हा प्रयोग चांगला वाटला तर तो सामान्यांना परवडणारा नाही. पण, बिअरवर कार चालते हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरला.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live