व्यंगचित्रकार संतोष भिसे यांनी राजकीय भूकंपावर लगावले 'फटकारे'

सिध्दी सोनटक्के
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

शनिवारची सकाळ महाराष्ट्राची झोप उडवणारी, अचानक देवेंद्र फडणवीस पुन्हा आले आणि सोबत येताना  अजित पवारांना घेऊन आले. त्यांनी शपथविधी उरकला,सावध अशी प्रतिक्रिया दिली आणि अहो ! छुमंतर झाले.. 

शनिवारची सकाळ महाराष्ट्राची झोप उडवणारी, अचानक देवेंद्र फडणवीस पुन्हा आले आणि सोबत येताना  अजित पवारांना घेऊन आले. त्यांनी शपथविधी उरकला,सावध अशी प्रतिक्रिया दिली आणि अहो ! छुमंतर झाले.. 
नंतर महाराष्ट्राच्या राजकाराणात भूंकपाचे धक्केच एकावर एक हादरे देत होते.. नेमक काय घडणार?आता पुढे काय होणार? अशी धास्ती होती.. 100 तास ट्विस्टवर ट्विस्ट घडत असताना, पुन्हा अचानक राजीनामा सत्र आणि चर्चांना उधाण आलं. पॉवरफुल खेळीच शरद पवार मुरंबी राजकारणी असल्याचं बोललं जाऊ लागलं. आणि अश्याच आशयाचे पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागलयं. असंच एक व्यंगचित्र  तरूण व्यंगचित्रकार संतोष भिसे यांनी  साकारलाय ...

या मथळ्याखाली शरद पवारांना राजकीय भूकंपाच्या नाट्याचे सुत्रधार मानण्यात आलयं..  खुर्चीवरून देवेंद्र फडणवीस पडतायत, तर अजित पवार पळत काकांकडे परत येतायत.. तर खांद्याला धनुष्यबाण अडकवून उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर विराजमान होतायत.फडणवीसांच्या खुर्चीचा एक पाय तोडून तो उद्धव ठाकरेंच्या खुर्चीला जोडण्याची किमया शरद पवारच करु शकतात !महत्वाचं म्हणजे या सगळ्या खेळीवरून नरेंद्र मोदी आणि अमित शहा दरवाजा आडून मज्जा घेतायत का असा प्रश्न पडावा असं चित्र मांडण्यात आलंय....व्यंगचित्रकार संतोष भिसे यांनी मार्मिकपणे महाराष्ट्रातल्य़ा राजकीय भूंकपावर 'फटकारे' लगावलेत


संबंधित बातम्या

Saam TV Live