सुप्रिया सुळेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाविरोधात तक्रार दाखल

सुप्रिया सुळेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाविरोधात तक्रार दाखल

पुणे : खासदार सुप्रियाताई सुळे यांनी इव्हीम मशीनबाबत अनेक माध्यमांना काल मुलाखती दिल्या. त्यानंतर एका वृत्तवाहिनीच्या फेसबुक पेजवर कोल्हापूर येथील अक्षय तांबवेकर (वय-१८वर्ष, वारणा नगर, कोल्हापूर) याने अतिशय आक्षेपार्ह पोस्ट केली.

याबाबत विरुध्द पुणे शहर व खडकवासला राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांनी रात्री उशिरा १०.३० वाजता सिंहगड रस्ता परिसरातील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्या संदर्भात सायबर क्राईम मार्फत याचा तपास केला जाणार आहे. असे पोलिस निरीक्षक दुर्योधन पवार यांनी सकाळशी बोलताना सांगितले.
    
''समाजाला लागलेली हि किड नाहीशी व्हावी यासाठी इथुन मागे देखील अनेक वेळा कायदेशीररीत्या आम्ही मार्ग अवलंबत आहोत. पण आता हे शांत बसणं अशक्य होतंय. कमजोर कधीच नव्हतो पण संस्कार बरोबर घेऊन वाटचाल करतोय म्हणून विचारांनी लढत होतो. पण यापुढे पवार साहेब, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे व पक्षाच्या कोणत्याही नेत्यांबद्दल अश्लील व बेताल वक्तव्य कराल तर, कायदेशीर गुन्हा दाखल करू याची दखल घ्यावी. असा इशारा पुणे शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.

Web Title : marathi news case filed against person who wrote objectionable comment about NCP leader Supriya Sule on fb live

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com