STRANGE | मुंबईत मांजरांची नसबंदी का करणार?

STRANGE | मुंबईत मांजरांची नसबंदी का करणार?

मुंबई - मुंबईत मांजरांचा वाढलेला उपद्रव रोखण्यासाठी महापालिकेला मुहूर्त सापडला आहे. प्रशासनाने जानेवारीपासून मांजरांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे काम चार संस्थांद्वारे चार केंद्रांत केले जाईल. त्यामुळे मांजरांच्या वाढीवर नियंत्रण येणार आहे. 

मुंबईत भटक्‍या कुत्र्यांप्रमाणेच भटक्‍या मांजरांचा उपद्रवही प्रचंड वाढला आहे. कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणारा जीवघेणा रेबीज आजार रोखण्यासाठी खासगी संस्थांमार्फत कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जात आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी मांजरांच्या उपद्रवाने नागरिक हैराण आहेत. महापालिकेच्या अनेक रुग्णालयांत मांजरांचा वावर वाढल्याने रुग्ण त्रस्त झाले आहेत.  या पार्श्‍वभूमीवर बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी महापालिकेच्या महासभेत मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला मंजुरी मिळाली आहे.

ताज्या अपडेट्स आणि बातम्यांच्या सविस्तर विश्लेषणासाठी पाहात राहा...
साम टीव्ही न्यूज ||LIVE||

LINK :: https://www.youtube.com/watch?v=HLSD_Eog4_Q

पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात
SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel
Link - www.youtube.com/user/SaamTV

फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा
Facebook - www.facebook.com/SaamTV/
Twitter - www.twitter.com/saamTVnews

साम टीव्ही
बातमी जी व्यवस्था बदलेल!

 

Web Title: Cat sterilization will be held in Mumbai from January

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com