सीबीआयचे संचालक आलोक वर्मा सक्तीच्या रजेवर; नागेश्वर राव सीबीआयचे नवे हंगामी संचालक

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. त्यांच्या जागी नागेश्वर राव यांची प्रभारी संचालक म्हणून तातडीनं नियुक्ती करण्यात आलीय. नागेश्वर राव हे सीबीआयच्या सह संचालकपदी होते. आता त्यांच्यावर संचालक पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

दरम्यान, रजेवर पाठवण्यात आलेले आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश आस्थाना यांच्यातला वाद विकोपाला गेल्यानंतर नागेश्वर राव यांच्या हातात सीबीआयची सूत्रे आली आहेत. 

सीबीआय बाबत धक्कादायक बातम्यांचं सत्र 

सीबीआयच्या एका विशेष पथकानं सोमवारी आपल्याच कार्यालयाच्या दहाव्या मजल्यावर छापेमारी केली. संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश आस्थाना यांच्यातला वाद मिटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मध्यस्ती करण्याची वेळ आली आणि मोदींनी या दोघांना आपल्याला भेटण्यासाठी बोलावलं, त्याच वेळी ही छापेमारी करण्यात आली. या छाप्या दरम्यान सीबीआयचेच एक अधिकारी देवेंद्र कुमार यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयमध्ये जे काही सुरू आहे त्यानं सीबीआय सारख्या संस्थेची प्रतिमा मलिन झालीय एवढं नक्की.

WebTitle : marathi news CBI Director Alok Verma relieved of his duties and sent on leave.

संबंधित बातम्या

Saam TV Live