CBI चे संचालक आलोक वर्मा यांच्यावरील चौकशी 10 दिवसांत पूर्ण करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

सुप्रीम कोर्टात सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान मूख्य न्यायमूर्तींनी केंद्रिय दक्षता आयोग म्हणजेच (CVC) ला 10 दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

नियमांचं उल्लंघन करुन पदावरुन दूर हटवल्याचं सांगत, सक्तीच्या रजेवर  जावं लागलेल्या आलोक वर्मांनी कोर्टात आव्हान दिलं होतं. माजी न्यायमूर्ती ए.के. पटनाईक यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती या सर्व प्रकरणाची चौकशी करणार असून, दिवाळीनंतर या प्रकरणावर सुनावणी घेणार असल्याचं न्यायाधिशांनी स्पष्ट केलं.

तसंच, हंगामी सीबीआय संचालक नागेश्वर राव यांना महत्त्वाचा कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचं कोर्टाने सांगितलं.

संबंधित बातम्या

Saam TV Live