'व्हिडिओकॉन' सीबीआयच्या कचाट्यात; कार्यालयांवर छापे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 जानेवारी 2019

मुंबई: व्हिडीओकॉन समूहाचे वेणूगोपाल धूत आणि आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या नूपॉवर रिन्युएबलवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. तसेच सीबीआयने व्हिडीओकॉन आणि नूपॉवर रिन्युएबलच्या कार्यालयांवर देखील छापेमारी केली आहे. सीबीआयने गुरुवारी कंपनीच्या मुंबई, औरंगाबादमधील कार्यालयांवर छापे टाकले.गेल्यावर्षी मार्च महिन्यात  सीबीआयने दीपक कोचर, वेणूगोपाल धूत आणि त्यासंबंधित अन्य काही  लोकांची प्राथमिक चौकशी सुरू केली होती.

काय आहे प्रकरण? 
आयसीआयसीआय आणि व्हिडीओकॉन यांच्यादरम्यान झालेल्या कर्जवाटपासंदर्भात सीबीआयकडून छापा टाकण्यात आले आहे. चंदा कोचर यांच्या नावाचा वापर करून आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉनला कर्ज दिले आहे. त्याबदल्यात दीपक कोचर यांना व्हिडीओकॉनने सहाय्य केले होते असा आरोप करण्यात आला आहे. चंदा कोचर यांचे नाव यात आल्यामुळे त्यांना यसीआयसीआय बँकेच्या सीईओ पदावरून पायउतार व्हावे लागले होते. 
 कोचर यांनी आयसीआयसीआयच्या प्रमुख असताना धूत यांच्या कंपनीला  3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जाच्या बदल्यात वेणूगोपाल धूत यांनी दीपक कोचर यांच्या नूपॉवरमध्ये 64 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा आरोप एका गुंतवणूकदाराने केला होता.

Web Title :: marathi news cbi raids videocon offices   

संबंधित बातम्या

Saam TV Live