आज सीबीएसईचा दहावीचा निकाल 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 29 मे 2018

केंद्रीय शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. दुपारी चार वाजता हा निकाल जाहीर होईल, अशी घोषणा 'सीबीएसई'ने केली आहे. देशभरातून १६ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. 

दहावीच्या परीक्षेचा निकाल cbse.nic.in या वेबसाइटवर दुपारी चारनंतर पाहता येईल. यंदाची दहावीची परीक्षा काहीशा गोंधळातच पार पडली. दिल्ली-एनसीआर, हरियाणा व झारखंड येथे गणिताचा पेपर फुटल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या विषयाची परीक्षा पुन्हा घ्यावी की नाही, यावर वादंग झाल्यानंतर अखेर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ही परीक्षा पुन्हा न घेण्याचाच निर्णय घेतला होता.

संबंधित बातम्या

Saam TV Live