विविध मागण्यांसाठी मध्य रेल्वेतील मोटरमनचा आजपासून आंदोलनाचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

मध्य रेल्वेवरील मोटरमननी वेगवेगळ्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आजपासून जादा तास काम न करण्याचा गंभीर इशारा दिला आहे. त्यात लाल सिग्नल चुकवल्यास सेवेतून मुक्त करणे, रिक्त पदे भरणे आदी प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन पुकारले जाणार आहे.

या संदर्भात गुरुवारी रात्री उशीरापर्यंत मोटरमनप्रतिनिधी आणि मध्य रेल्वे प्रशासनामध्ये बैठकांचे सत्र सुरू होते. हे आंदोलन झाल्यास मध्य, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा काही प्रमाणात विस्कळीत होण्याची भीती आहे.

मध्य रेल्वे मोटरमन श्रेणीत सध्या 271 पदे रिक्त आहे. पदांची भरती करतानाच कारवाईची तीव्रता कमी करण्याची मागणी मोटरमन वर्गातर्फे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने केली आहे. यापूर्वी, पश्चिम रेल्वेवरील गार्डांनी एकत्रित येत विविध मागण्यांसाठी जादा तास काम न करण्याचे आंदोलन केले होते.

WebTitle : marathi news central railways motormen to start agitation for various demands 

संबंधित बातम्या

Saam TV Live