प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत असल्याने मध्य रेल्वेकडून रविवारचे वेळापत्रक रद्द

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 जुलै 2019

मुंबई : मध्य रेल्वेकडून रविवारचे वेळापत्रक रद्द करण्यात आले आहे. कमी लोकल फेऱ्यांमुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत होता. या लोकल गर्दीमध्ये मुंब्रा कळवा दरम्यान 3 प्रवासी पडले असून 2 पुरुष तर एक महिला जखमी झाल्या आहेत. यामुळे मध्य रेल्वेने रविवारचे वेळापत्रक रद्द करण्याचा निर्णय घेतला.

हवामान खात्याने पुन्हा जोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा दिल्याने मध्य रेल्वेने आज बुधवार 3 जुलैला रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे कमी लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला होता.

आज कामकाजाचा दिवस असल्याने व लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसार धावत असल्यामुळे रेल्वे स्थानकांत प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. प्रवाशांची जादा गर्दी कमी लोकल फेऱ्यांमध्ये सामावू शकत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. केवळ हवामान खात्याच्या भरवशावर कमी फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

मध्य रेल्वे दररोज 1774 लोकल फेऱ्या चालवत असते. मध्य रेल्वेने दररोज जवळपास 43 लाख प्रवासी प्रवास करीत असतात. रविवारी मेगाब्लॉक असल्याने तसेच सार्वजनिक सुट्टी असल्याने मध्य रेल्वे केवळ 1424 फेऱया चालवते म्हणजे तब्बल 350 फेऱया कमी चालवते. परिस्थिती पाहून स्पेशल फेऱयाही चालवण्यात येणार असल्याचे रेल्वेने म्हटले असले तरी प्रवाशांना नेहमीप्रमाने आजही गर्दीचा सामना करावा लागणार आहे .

Web Title: central railways sunday s time table has been cancelled

संबंधित बातम्या

Saam TV Live