छगन भुजबळांना मोठा दिलासा; अटक टळली 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 जून 2018

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांना विशेष पीएमएलए कोर्टानं दिलासा दिलाय. 6 ऑगस्टपर्यंत भुजबळांना अटक होणार नाही मात्र भुजबळांना पर्सनल बॉण्ड भरावा लागेल असे आदेश कोर्टानं दिले आहेत.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या दोन वर्ष तुरूंगात होते. अलिकडेच त्यांना जामीन मंजूर झालाय. त्यानंतर भुजबळांनी राज्यभर दौरे करण्यात सुरूवात केलीय. गेल्याच आठवड्यात त्यांनी शिर्डी आणि वणीच्या देवीच्या दर्शन घेतलं. आता पीएमएल कोर्टानं दिलासा दिल्यानं भुजबळांसह कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live