छगन भुजबळ यांना अखेर जामीन मंजूर

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 मे 2018

मुंबई : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद भूषवलेल्या छगन भुजबळ यांना अखेर आज मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. जर कागदपत्रांची पूर्तता पूर्णझाली तर भुजबळ आजच तुरंगाबाहेर येऊ शकतात. 

महाराष्ट्र सदन बांधण्याच्या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे आरोप भुजबळ यांच्यावर ठेवण्यात आले होते. 14 मार्च 2016 पासून म्हणजे जवळजवळ 25 महिन्यापेक्षा जास्त काळ भुजबळ तुरुंगात होते. 

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉंडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. मुंबईतील एन्फोर्समेंट डिरेक्‍टरेटच्या कार्यालयात झालेल्या 11 तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर त्यांना ही अटक झाली. बांधकाम व्यावसायिक चमनकार यांच्यावर भुजबळ यांच्या काळात मेहेरनजर दाखविली गेली असा त्यांच्यावर आरोप होता. 

भुजबळांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतून केली. शिवसेना सोडून त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षात आले आणि त्या पक्षात महत्वाचा नेता बनले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ते प्रदेशाध्यक्षही होते. 

संबंधित बातम्या

Saam TV Live