छगन भुजबळ - मधुकर पिचड यांची झाली भेट : दोन्ही दिग्गजांना अश्रू अनावर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 10 मे 2018

नगर : अकोले येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मैत्री सर्वश्रूत आहे. भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांना मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल पिचड यांनी मुंबईत जावून त्यांची भेट घेतली. एेकेकाळी राष्ट्रवादीचे दिग्गज असलेले हे दोन नेते एकमेकांना भेटल्यावर दोघांनाही अश्रू अनावर झाले.

भुजबळ यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी अटक होऊन दोन वर्षे झाली. शुक्रवारी (ता. ४) त्यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईच्या के. ई. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल पिचड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजी गर्जे यांनी भुजबळ यांची रुग्णालयात भेट घेतली.

जुन्या आठवणींना उजाळा
पिचड व भुजबळ यांनी बराच वेळ गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार हेच देशाला तारू शकतात. त्यांचीही तब्येत बरी नाही, पण त्यांनी खूप धावपळ करून चालणार नाही. त्यांना म्हणावं थोडा आराम करा, असा निरोपही भुजबळ यांनी पिचड यांना दिला. भुजबळ यांनी आपल्याला तुरुंगात प्रशासनाने दिलेला त्रास कथन केला. आजारी असतानाही प्रशासनाकडून झालेल्या त्रासाची व्यथा मंडताना त्यांना अश्रू अनावर झाले.

संबंधित बातम्या

Saam TV Live