जामिनावर सुटल्यानंतर छगन भुजबळ यांनी घेतली शरद पवारांची भेट 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 मे 2018

जामिनावर सुटका झालेल्या छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. जामिनावर सुटल्यानंतर छगन भुजबळ यांची शरद पवारांसोबतची ही पहिलीच भेट आहे. जामीन मिळाल्यानंतर पहिला फोन शरद पवार यांचा आला होता, असं भुजबळांनी आवर्जून पत्रकारांना सांगितलं होते.  त्यानंतर त्यांची पवारांसोबत भेट घेतलीये.  या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून, पवारांनी तब्येतीबाबच विचारपूस करुन, काळजी घेण्याचा सल्ला दिल्याची प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे. या भेटीवेळी भुजबळांचा मुलगा पंकज भुजबळदेखील उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Saam TV Live