चाकणमध्ये ३ हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 31 जुलै 2018

चाकणमध्ये मराठा क्रांती मोर्च्यातील तब्बल तीन हजार नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठया प्रमाणात मोर्च्यात समावेश होता. शाळा कॉलेज सुरु करण्याचं पोलिसांनी आवाहन आहे.

दरम्यान, कालच्या हिसांचारानंतर चाकणमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. चाकणकडे जाणारी बस वाहतूकही यावेळी बंद ठेवण्यात आलीये. काल उसळलेल्या हिंसाचारात शंभराहून अधिक गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. 

आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाला काल हिंसक वळण लागल्यामुळे चाकण परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात  आले होते.

आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पोलिसांच्या गाड्यांसह मालवाहू ट्रक, बस, एसटी अशा शंभराहून अधिक गाड्यांची जाळपोळ केली होती. आंदोलकांनी चाकणची मुख्य पोलिस चौकीही जाळली होती. 

WebLink : marathi news chakal maratha reservation cases registered on 300 protesters  

संबंधित बातम्या

Saam TV Live