महाराष्ट्रात तीन दिवसात गारपीटीची शक्यता

महाराष्ट्रात तीन दिवसात गारपीटीची शक्यता

मुंबई : राज्यात पावसाने यंदा चांगलंच हैराण करुन सोडलं होतं. मात्र तेव्हापासून आतापर्यंत पावसांचं ठाण राज्यात मांडूनच आहे. कालंही मुंबईत सकाळी पावसाचा शिडकावा झाला. तर डिसेंबर सुरु होऊनही थंडी आजुनही नाही. 

त्यातच आता राज्यभरात येत्या तीन दिवसांत गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आलीय. डिसेंबर महिना आला तरीही राज्यात थंडीचं वातावरण दिसत नाही. अशात हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्यास राज्यात थंडीची लाट अचानक वाढू शकते. दरम्यान पुण्यातील वेधशाळेने सुद्धा राज्यात पावसाची शक्यता व्यक्त केली होती.

आता गारपीट झाल्यास मह्राष्ट्रात सर्वत्र थंडीचं प्रमाण जास्त वाढू शकतं. लांबलेला पाऊस आणि बदललेलं हवामानाचं वातावरण त्यात आता गायब झालेली थंडी यामुळे काहिसे वेगळे परिणाम या हवामानात होऊ शकतात.  राज्याच्या पश्चिमेकडील अरबी समुद्रात एकाच वेळी दोन चक्रीवादळांची निर्मिती होतेय. अरबी समुद्राच्या नैऋत्य भागात कमी दाबाची अतितीव्र क्षमतेची दोन क्षेत्रं एकाच वेळी निर्माण झालीयेत. कमी दाबाचे हे भोवऱ्यासारखे क्षेत्र अजून राज्याच्या पश्चिम किनाऱ्यापासून बरेच दूर असले, तरी आगामी 12 ते 48 तासांत, त्यांचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची दाट शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.  आणि असंच झाल्यास 2019 हे वर्ष चक्रीवादळ वर्ष म्हणूनच ओळखलं जाईल. असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय.

Web Title -  Chance of hailstorm in Maharashtra in three days

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com