व्हिडीओकॉन समुहाला 3 हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज दिल्य़ाने ICICI बँकेच्या चंदा कोचर अडचणीत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 मार्च 2018

व्हिडीओकॉन समुहाला 3 हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज दिल्य़ाने ICICI बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर अडचणीत आल्या आहेत. व्हिडीओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांनी 2008 मध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यासोबत एक कंपनी सुरु केली होती. ICICI  बँकेकडून कर्ज मिळताच धूत यांनी अवघ्या 9 लाख रुपयांमध्ये दीपक कोचर यांना ती कंपनी विकल्याचे समोर आले आहे. हे सर्व व्यवहार आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. डिसेंबर 2008 मध्ये दीपक कोचर आणि वेणुगोपाळ धूत यांनी न्यू पॉवर रिन्यूएबल्स ही कंपनी सुरु केली होती. या कंपनीत धूत यांच्याकडे 50 टक्के समभाग होते.

व्हिडीओकॉन समुहाला 3 हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज दिल्य़ाने ICICI बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर अडचणीत आल्या आहेत. व्हिडीओकॉन समुहाचे अध्यक्ष वेणुगोपाळ धूत यांनी 2008 मध्ये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्यासोबत एक कंपनी सुरु केली होती. ICICI  बँकेकडून कर्ज मिळताच धूत यांनी अवघ्या 9 लाख रुपयांमध्ये दीपक कोचर यांना ती कंपनी विकल्याचे समोर आले आहे. हे सर्व व्यवहार आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. डिसेंबर 2008 मध्ये दीपक कोचर आणि वेणुगोपाळ धूत यांनी न्यू पॉवर रिन्यूएबल्स ही कंपनी सुरु केली होती. या कंपनीत धूत यांच्याकडे 50 टक्के समभाग होते. तर दीपक कोचर यांच्या कंपनीकडे उर्वरित समभाग होते. 


संबंधित बातम्या

Saam TV Live