व्हिडीओकॉनप्रकरणी चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्या घरावर छापे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 1 मार्च 2019

नवी दिल्ली: आयसीआयसीआय बँक आणि व्हिडीओकॉन कर्जप्रकरणी आज (शुक्रवार) सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई करत चंदा कोचर आणि वेणुगोपाल धूत यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापे मारले आहेत. एकूण पाच ठिकाणी ही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

नवी दिल्ली: आयसीआयसीआय बँक आणि व्हिडीओकॉन कर्जप्रकरणी आज (शुक्रवार) सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) कारवाई करत चंदा कोचर आणि वेणुगोपाल धूत यांच्या कार्यालयावर आणि घरावर छापे मारले आहेत. एकूण पाच ठिकाणी ही कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी असताना चंदा कोचर यांनी व्हिडीओकॉन समूहाला 3250 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. मात्र हे कर्ज वाटप करत असताना त्यांचे पती दीपक कोचर यांच्याशी संबंधित कंपनीला मोठा फायदा झाल्याने त्यांनी 'लाभाच्या पदाचा' गैरवापर झाला असल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. त्याचबरोबर बॅंकेअंतर्गत नेमलेल्या समितीने देखील त्यांना दोषी ठरविले आहे. परिणामी चंदा कोचर यांच्या बँकिंग क्षेत्रातील 30 वर्षांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. याशिवाय जानेवारी महिन्यात सीबीआयने चंदा कोचर यांना लुकआऊट नोटीस जाहीर केली आहे. ज्या अंतर्गत त्यांना सरकारी संस्थांच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जात येणार नाही. 

काय आहे प्रकरण? 
देशातील प्रमुख 20 बँकांच्या कॉन्सॉर्टियमने व्हिडीओकॉन समूहाला 40 हजार कोटींचे कर्ज मंजूर झालेलं होते. यापैकी आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन समूहाला 3200 कोटींचे कर्ज दिले हते. मात्र, कर्ज मंजूर केल्यानंतर व्हिडीओकॉनने चंदा कोचर यांच्या पतीच्या मालकीच्या न्यू पॉवर रिन्यूएबल्स या कंपनीमध्ये 64 कोटींची गुंतवणूक केली होती. ही गुंतवणूक म्हणजे कर्ज मंजुरी प्रकरणातील लाच /लाभ असल्याचा आरोप करत 'जागल्या'ने  देऊन हे प्रकरण बाहेर काढले आहे. 

Web Title: Chanda Kochhar, Videocon's Venugopal Dhoot's Homes Searched In Loan Case


संबंधित बातम्या

Saam TV Live