VIDEO | ठाकरे सरकारची कर्जमाफी पूर्णपणे फसवी - चंद्रकांत पाटील

VIDEO | ठाकरे सरकारची कर्जमाफी पूर्णपणे फसवी - चंद्रकांत पाटील

शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. आधी भाजपनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप होत होता. कारण वार्षिक फक्त 25 हजार रुपये सरकारनं माफ केले होते. त्यावर भाजपवर विरोधकांनी चांगलेच ताशेरेही ओढले होते.

मात्र आता उद्धव ठाकरेंनी केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येतोय.  उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी करण्याआधी त्यात कुठल्याही प्रकारचे निकष नसणार असल्याची घोषणा केली होती. पण आता चित्र काहीसं वेगळंच दिसतंय. त्यात काही अटी आणि निकष लावल्यानं सरकारवर टीका करण्यात येतेय. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.  

उद्धव ठाकरे सरकारने केलेली कर्जमाफी पूर्णपणे फसवी असल्याचं सांगत, या कर्जमाफीवर चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतलाय. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उद्धव ठाकरेंची फसवणूक सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला. याउलट यावर तर ही कर्जमाफी योग्य नसल्याचं मत राजू शेट्टींनी व्यक्त केलंय

"शेतकऱ्यांची क्रूरपणे फसवणूक"

योजनेनुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना, कर्जमाफी लागू करण्यात आलीय. यावर शेतकरी कर्जमाफीचा काढण्यात आलेल्या शासनादेश म्हणजे, विश्वासघाताची परिसीमा आहे. शेतकऱ्यांना क्रूरपणे फसविले गेल्याचा आरोप शेतकरी नेते डॉक्टर अजित नवलेंनी केलाय.

Web Title -  Chandrakant Patil  Criticism on shivsena loan forgiveness

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com