मोबाईल कंपन्यांच्या मार्केटिंग कॉलमुळे VVIP मंत्रीही हैराण

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 मे 2018

मोबाईल कंपन्यांच्या मार्केटिंग कॉलमुळे सामान्य नागरिक तर हैराण आहेतच.  पण या कॉल्समुळे VVIP असलेले मंत्रीही हैराण आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळातले दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी थेट बोलण्यासाठी एक हॉटलाईन नंबर घेतला. या नंबरवरही मार्केटिंग कॉलनं अतिक्रमण केलंय. मुख्यमंत्र्यांचा कॉल दिवसभरातून कधीतरी एकदा येतो पण मोबाईल कंपनीचे मार्केटिंग कॉल दिवसभरातून दहा ते बारा वेळा येत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. सोलापुरात पत्रकार परिषद सुरू असताना चंद्रकांतदादांचा हॉटलाईन फोन वाजला.

मोबाईल कंपन्यांच्या मार्केटिंग कॉलमुळे सामान्य नागरिक तर हैराण आहेतच.  पण या कॉल्समुळे VVIP असलेले मंत्रीही हैराण आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळातले दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी थेट बोलण्यासाठी एक हॉटलाईन नंबर घेतला. या नंबरवरही मार्केटिंग कॉलनं अतिक्रमण केलंय. मुख्यमंत्र्यांचा कॉल दिवसभरातून कधीतरी एकदा येतो पण मोबाईल कंपनीचे मार्केटिंग कॉल दिवसभरातून दहा ते बारा वेळा येत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. सोलापुरात पत्रकार परिषद सुरू असताना चंद्रकांतदादांचा हॉटलाईन फोन वाजला. मुख्यमंत्र्यांचा फोन असेल म्हणून त्यांनी फोन तातडीनं उचलला. पण पलिकडून एका मुलीनं त्यांना फोनचा नवा प्लॅन सांगण्यास सुरुवात केली. दररोज मार्केटिंगचे दहा बारा कॉल येत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. मार्केटिंगच्या या कॉल्समुळे हॉटलाईन बोंबलल्याचा अनुभव चंद्रकांत पाटलांना आलाय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live