भाजपला पुन्हा का आठवली शिवसेना? चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय गोटात चर्चांना उधाण

साम टीव्ही
मंगळवार, 28 जुलै 2020
  • राज्याच्या हितासाठी सेनेसोबत एकत्र यायला तयार'
  • चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय गोटात चर्चांना उधाण
  • भाजपला पुन्हा का आठवली शिवसेना?

आता बातमी चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्याची. शिवसेनेसोबत आम्ही पुन्हा एकत्र येण्यास तयार आहोत असं वक्तव्य चंद्रकातदादांनी केलं आणि राजकीय गोटात चर्चांना उधाण आलं. महाराष्ट्रातील जनतेच्या भुवया उंचावल्या. नेमकं काय झालंय. वाचा.

महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असं तीन रंगाचं सरकार सत्तेत आहे. अनपेक्षित घडामोडींमुळे, सर्वात जास्त जागा येऊनही भाजपला सत्तेचा सोपान काही चढता आला नाही. हे सत्तेबाहेर राहणं भाजपच्या चांगलंच मनाला लागलंय, त्यातूनच भाजपकडून कायमच टीकेच्या फैरी झाडण्यात आल्या. हे सगळं असतानाच, राज्याच्या हितासाठी आम्ही आजही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. पण एकत्र आल्यावर निवडणुका मात्र एकत्र लढवणार नाही. असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र यावर सावध भूमिका घेतलीय.

असं असलं तरी काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावलीय.

काँग्रेसकडून सेना-भाजप एकीची शक्यता फेटाळलीय आणि तिकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.

खरंतर, अनेक वर्ष दोस्ताना राहिलेल्या शिवसेना-भाजपमधली दरी गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढलीय. त्यामुळे ताणलेल्या संबंधांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला जवळ घेण्याचा प्रयत्न केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहेच, पण त्यासोबत भाजपला पुन्हा शिवसेना का आठवावी लागली? अशीही कुजबूज सुरू झालीय.


संबंधित बातम्या

Saam TV Live