चंद्रपूर : भाजपनं नगरसेवकांना का लपवलं?

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजपच्या सर्व नगरसेवकांची अज्ञातस्थळी पाठविण्यात आले आहे. महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं ही खबरदारी घेतली आहे.

मात्र पक्षांतर्गत संघर्षाचा फटका महापौर निवडणुकीत बसू नये म्हणून पक्षानं ही खबरदारी घेतली आहे. भाजपला पालिकेमध्ये पूर्ण बहुमत आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत ६६ पैकी भाजपचे ३७ नगरसेवक आहेत. तर मित्रपक्ष मिळून ४३ नगरसेवकांचं समर्थन आहे.

राज्यभरातील २७ महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. ज्यामध्ये चंद्रपूर मनपासाठी खुल्या प्रवर्गातील महिला नगरसेवकासाठी आरक्षण असणार आहे. महापालिकेत भाजप बहुमतात आहे. भाजपमधील नगरसेवक यामुळे आता महापौरपदासाठी प्रयत्नात आहे.

दरम्यान, चंद्रपुरात सलग चौथ्यांदा महापौरपदासाठी महिलेची निवड होणार आहे. याआधी काँग्रेसच्या संगीता अमृतकर, भाजपच्या राखी कंचर्लावार आणि विद्यमान महापौर अंजली घोटेकर यांनी महापौरपदाची धुरा याआधी सांभाळली होती. आता पुन्हा एकदा महिला महापौर होणार आहे. भाजपमध्ये काही जण इच्छूक असल्याने नाराज होऊन पक्ष विरोधात जावू नये म्हणून भाजपने काळजी घेत नगरसेवकांना अज्ञातस्थळी पाठवलं आहे.

Web Title: chandrapur bjp corporators shifted to unknown place

संबंधित बातम्या

Saam TV Live