चंद्रपुरात 500 कोटींचा कोळसा घोटाळा; कोळसा माफियांना राजकीय वरदहस्त? 

संजय तुमराम साम टीव्ही चंद्रपूर
शुक्रवार, 26 जुलै 2019

भद्रावती तालुक्यातल्या या कोळसा खाणीतील कोळशावर चोरांनी हात साफ केलेत. थोडं थोडकं नाही तब्बल ३ लाख ५७ हजार मेट्रीक टन  कोळसा गायब झालाय. चोरीला गेलेल्या कोळशाची किमंत तब्बल पाच कोटींच्या घरात आहे .हा कोळसा गेला कुठे, याचं उत्तर प्रशानाकडेही नाही.

कर्नाटक एम्प्टा कोलमाईन्स कंपनीकडून 12 सप्टेंबर 2005 पासून कोळसा उत्खनन करण्यात येत होतं. कोळसा घोटाळ्यात खाण अडकल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 31 मार्च 2015 पासून उत्खन्न बंद करण्यात आलं. खाण बंद करतेवेळी चार लाख 51 हजार 284 मेट्रीक टन कोळसा शिल्लक असल्याची नोंद 2018 मध्ये प्रशासनानं केली होती. यापैकी 94 हजार मेट्रीक टन कोळसा जळल्याचं जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार सांगत आहेत. मात्र 3 लाख 54 हजार मेट्रीक टन कोळसा गेला कुठे याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. 

जिल्ह्यातील दोन बड्या कोळसा माफियांनी हा कोळसा खासगी वीज कंपन्यांना विकल्याचं सांगितलं जातंय...या कोळसा माफियांना स्थानिक नेत्यांचं वरदहस्त असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात  सुरु आहे.... या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यास मोठा कोळसा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे..मात्र चौकशीची हिम्मत प्रशासन दाखवणार का हा खरा सवाल आहे

WebTitle : marathi news chandrapur coal scam worth rs 500 cr  

संबंधित बातम्या

Saam TV Live