चंद्रपुरात कपाशी वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

चंद्रपुरातील गोंडपिंपरी तालुक्यात सकमूर येथील एका शेतक-याने कपाशीला खत देण्यासाठी चक्क विद्यार्थ्यांना कामाला लावलंय. 200 रुपयांच्या मजुरीवर या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चालवला आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असताना देखील ही मुलं अनवाणी शेतात काम करतांना आढळली आहेत.

या भागात अतिवृष्टिमुळे कपाशी संकटात आहे. कपाशी वाचवण्यासाठी या मुलांना संकटात टाकलं जातंय. ही सर्व मुलं सकमूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिकतात. सात ते अकरा वयोगटातील ही मुलं आहेत.

केवळ 200 रुपये मिळतात म्हणून ते ही जोखीम घेत आहेत. शेतमालक जादा मजुरी वाचवण्यासाठी लहान मुलांकडून काम करवून घेतल्याचं समजतंय.

WebTitle : marathi news chandrapur farmer used kids to work in farm 

संबंधित बातम्या

Saam TV Live