चंद्रपूरमध्ये शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

राज्यात शेतकरी आत्महत्याच्या घटना काही थांबण्याची चिन्हं दिसत नाही आहेत. चंद्रपूरमध्ये एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील कोथुळना येथील 40 वर्षीय प्रवीण वामन ठाकुर यांनी गावालगत असलेले अरविंद नाकतोडे यांच्या शेतात गळफास घेतला. सकाळी 7 वाजताच्या सुमारास शेतमालक गेला असता ही घटना समोर आली. आत्महत्या केलेले शेतकरी प्रवीण ठाकूर यांच्यावर कर्ज असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळेच त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live