चंद्रपूरच्या अंगणवाडीत चिमुकल्यांना दिला जातोय अळ्यायुक्त पोषण आहार... वर्षानुवर्ष चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

चंद्रपूर जवळच असलेल्या नाकोडा येथील अंगणवाडीत मुलांना अळ्यायुक्त पोषण आहार दिला जात असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. अंगणवाडी केंद्र क्रमांक 5 आणि 8 मध्ये हा प्रकार आढळून आलाय. वर्षानुवर्षे एकाच बचतगटाला हे काम दिले जात आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे इतरांना संधी दिली जात नाही.

याचाच फायदा उचलत विद्यमान बचतगटाच्या महिला निकृष्ट आहार मुलांना देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळ करतायत. खिचडीमध्ये अळ्या, तर चण्यामध्ये किडे सापडलेत. अधिकचा आर्थिक फायदा लाटण्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप होतोय. हा संतापजनक प्रकार पालकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याची ग्रामपंचायतकडे तक्रार केली. विशेष म्हणजे याच गावात जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे राहतात.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live