वाघांवर होतोय भेकडपणे विषप्रयोग; चंद्रपुरातल्या वाघांचा जीव धोक्यात

वाघांवर होतोय भेकडपणे विषप्रयोग; चंद्रपुरातल्या वाघांचा जीव धोक्यात

देशभरात वाघांची संख्या वाढत असल्याचं चित्र दिसत असतानाच, काही नतद्रष्ट मात्र वाघांच्या जिवावर टपून बसल्याचं लाजिरवाणं चित्र महाराष्ट्रात दिसून आलंय. वाघांच्या मुक्त संचारासाठी मुबलक वनं असलेल्या चंद्रपुरात गेल्या दीड महिन्यांत तब्बल 4 वाघांनी आपला जीव गमावलाय. संतापजनक बाब म्हणजे या उमद्या जनावराचा जीव घेण्यासाठी चक्क विषप्रयोग केला जात असल्याचं समोर आलंय.

चांदा वन विभागातल्या पोडसा शिवारात एका वाघिणीचा मृतदेह सापडला. या वाघिणीच्या मृतदेहापासून सुमारे 100 मीटर अंतरावर एका रानडुकराचा मृतदेह दिसला. त्यावर विष टाकल्याचं दिसून आलं होतं. हाच प्रकार 8 जुलै रोजीही चिमूर वनपरिक्षेत्रातल्या मेटेपार गावाजवळ घडला होता. तिथं तर वाघीण आणि तिचे दोन बछडे मृतावस्थेत सापडले होते..त्यांच्यावरही विषप्रयोग केल्याचं दिसून आलं होतं.

वाघांवरच्या विषप्रयोगामागे शेतकरी असल्याची चर्चा आहे. कारण जंगलाला लागूनच शेती आहे. त्यामुळे वाघ, बिबट्यासह वन्यप्राणी शेतात येतात. शेतीचं नुकसान होतं. त्या पार्श्वभूमीवर या प्राण्यांना रोखण्यासाठी विषप्रयोग केला जात असल्याचं बोललं जातंय.

वाघ, बिबट्यासारख्या प्राण्यांना रोखण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी वीजप्रवाहही शेताच्या कुंपणातून सोडलेत.  वन्य प्राणी आणि मानव यांच्यातला संघर्ष काही नवा नाही. मात्र, या संघर्षात विषप्रयोगासारख्या अघोरी प्रकारांचा वापर करणं कधीही योग्य नाही. वाघांवर विषप्रयोग करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.

WebTitle : marathi news chandrapur tiger poisoning incidents observed 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com