मध्य रेल्वे मार्गांवरील 22 गाड्यांचं सुटण्याचं ठिकाण बदलणार...

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 4 मार्च 2020

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून लांब पल्ल्यावर धावणाऱ्या गाड्यांच्या वेग मर्यादेत वाढ केल्याने बऱ्याच गाड्यांचे वेळापत्रक बदलणार आहे. त्यासह मुंबईतून सुटण्याऱ्या गाड्याचे ठिकाणांतही बदल केला जाणार असल्याने, मध्य रेल्वेने सुमारे 22 गाड्यांचे 1 जुलै पासूनचे आगाऊ आरक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई एक्‍सप्रेस आणि हुबळी एक्‍सप्रेसच्या मुंबईतून सुटण्याच्या ठिकाणात बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. वेग मर्यादेत वाढ केल्याने संबंधित बदल केल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे यापूर्वी दादरवरून सुटणारी चेन्नई एक्‍सप्रेस 1 जुलैपासून लोकमान्य टिळक टर्मिनसवरून धावणार आहे. तर लोकमान्य टिळक टर्मिनसवरून धावणारी हुबळी एक्‍सप्रेस 1 जुलै पासून दादर वरून सुटेल.

दरम्यान, एलटीटी-हजरत निझामुद्दीन एसी एक्‍सप्रेस या एकमेव गाडीचे आगाऊ बुकिंग 30 जून पासून करता येईल. मात्र मध्य रेल्वेच्या या निर्णयाचा मोठा फटका महाराष्ट्रातील दादर-मडगाव, नागपूर-पुणे, सीएसएमटी-पंढरपूर, सीएसएमटी-शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.

Web Title  Change In Central Railways Time Table Departure Destination Changed For 22 Trains

संबंधित बातम्या

Saam TV Live