आधारमध्ये जन्मतारिख बदलणं झालं सोपं

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 2 एप्रिल 2019

देशात नव्याने युआयडीएआयकडून आधार बाबतच्या परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये आधार संचालकांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे देशभरतील नागरिकांचा क्षेत्रीय कार्यालयातील हेलपाटा वाचल्याने नागरिकांसह आधार केंद्र चालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. नवीन परिपत्रकानुसार आधारमधील जन्मतारिख ददलणे आता सोपे झाले आहे. 

सप्टेंबर २०१८ च्या परिपत्रकानुसार आधार कार्ड मधील जन्मतारीक तीन वर्षापेक्षा जास्त फरक असल्यास नागरिकांना आपापल्या राज्यातील युआयडीएआयच्या कक्ष कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. त्यात दुर्गम आदिवासी बांधवांना कक्ष कार्यालय शोधणे तिथे दोन ते तीन दिवसांचा मुक्काम करणे आर्थिक तसेच मानसिक दुष्ट्या त्रासाचे ठरत होते. सोमवार (ता. १) नव्याने काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार आधार कार्ड वरील जन्म तारिख अथवा नावात दुसऱ्या तिसऱ्यांदा बदल करावयाचा असल्यास कक्ष कार्यालात जाण्याची आवश्यकता नसल्याचे नवीन परिपत्रकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. वरील पैकी कोणत्याही प्रकारच्या आधारमध्ये बदल करावयाचा असल्यास टोल फ्री क्रमांक १९४७ अथवा ईमेल http://helf@vidai.gov.in किंवा पोस्टाने आपापल्या राज्यातील कक्ष कार्यालयात नागरिकांना आधारमधील बदलाकरीता मंजुरी मिळविण्यासाठी संपर्क साधण्याचे अवाहन युआयडीएआयकडून करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र राज्यासाठी युआयडीएआय कक्ष कार्यालय, एमटीएनएल बिल्डींग, कफ परेड जीडी सोमाणी मार्ग मुंबई या पत्यावर अर्ज करता येणार आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live