लढवय्या ते राजकीय मुत्सद्देगिर : शिवपुत्र छत्रपती राजाराम

लढवय्या ते राजकीय मुत्सद्देगिर : शिवपुत्र छत्रपती राजाराम

सातारा : राजाराम महाराजांचा जन्म झाल्यानंतर शिवाजी महाराज म्हणाले होते, ""राजाराम मोगलशाही पालथी घालील.'' त्यांचा हा विश्‍वास राजाराम महाराजांनी सार्थ ठरविला. दिल्ली जिंकण्यासाठी घोरपडे बंधूंना त्यांनी प्रोत्साहन दिले, तर कृष्णा सावंत यांना फौज देऊन उत्तेरकडे पाठवले. नर्मदा पार करून लष्करी मोहीम काढणारे कृष्णा सावंत हे पहिले मराठा वीर आहेत. तीन मार्च 1700 रोजी प्रकृतीअस्वास्थ्यामुळे राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन झाले. आजच्या युवा पिढीस त्यांचे चरित्र विविध ग्रंथांच्या माध्यमातून वाचण्यास उपलब्ध आहे.    

राजाराम महाराजांच्या वाट्याला फक्त तीस वर्षांचे (1670 ते 1700) आयुष्य आले. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी स्वराज्य रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आली. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर विस्कटलेले स्वराज्य सावरण्याचे महान कार्य राजाराम महाराजांनी केले. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या मराठा साम्राज्याला ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. मोगलांकडे गेलेल्या मराठा सरदारांना मराठ्यांच्या राज्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव करून देताना ते म्हणतात, ""हे मऱ्हाठे राज्य तुम्ही आम्ही मऱ्हाठे लोकी इनामासी खता (लबाडी) न करिता मराठा धर्माची दुरे (ईर्ष्या-अभिमान) धरून स्वामिकार्य करावे.'' शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठा धर्माचे रक्षण करणे ही तुमची- माझी सर्वांची प्रामाणिक जबाबदारी आहे, याची जाणीव त्यांनी या सरदारांना करून दिली.

राजाराम महाराज यांच्या काळापासुन स्वराज्यावरचा एकछत्री अमंल (खर्या अर्थाने) संपला. नंतरच्या काळात अनेक सत्ताकेद्रें निर्मान झाली. पुणे हे जरी मोठे सत्ताकेंद्र असले तरी नागपुर, कोल्हापुर, सातारा, बडोदा व नंतरच्या काळात ग्वाल्हेर, उज्जेन व ईंदोर ही मराठ्यांची उपसत्ताकेंद्रे होती. ती निर्माण का झाली, त्या पाठीमागे पार्श्वभुमी काय हे पाहण्यासाठी राजाराम महाराज यांच्या काळात जावे लागते कारण त्याचा उगम तिथे आहे. 

छत्रपती संभाजीराजे यांच्या हत्येमुळे मराठेशाहीचा पार कणा मोडून गेला. स्वराज्यास छत्रपती म्हणुन राजाराम महाराज यांना बसविण्यात आले. त्यांचा कालावधी फारच धामधुमीचा, दुष्काळाचा व कधी कधी नामुष्कीचा गेला. छत्रपती राजाराम व नंतर त्यांचा पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्य पाहीले व तो काळ गाजविला व राज्य (थोडेसे का होइना जिंवत ठेवले) त्या कालावधीसही आपण थोडक्यात भेट देऊ.
छत्रपती राजाराम यांचा सन १६७० च्या २४ फेब्रुवारीला जन्मले. जन्मताना ते पायाकडुन जन्मले म्हणुन सर्वजन चिंतीत झाले असता शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तवीले. (ही कथा) जरी राजाराम यांनी पातशीही पालथी घातली नाही तरी त्याने पातशाहाला मात्र झुंजवत ठेवुन यश मिळू दिले नाही, पातशाही खिळखिळी केली. राजाराम यांना लिहीता वाचता येत होते. राजाराम हे शांत घिरगंभीर प्रकृतीचा होते. राजाराम महाराजांचे लक्ष्करी शिक्षन हे हंबीरराव मोहीत्यांकडे ( स्वराज्याचे सरसेनापती व नात्याने सख्खे मामा) झाले. हंबीरराव हे कुडतोजी (प्रतापराव) गुजरानंतरचे सेनापती. प्रतापराव गेल्यावर शिवाजी महाराजांनी प्रतापरावांची मुलगी जानकीबाई हिच्याशी राजाराम यांंचे लग्न लावले.

राजाराम महाराजांनी सटवाजी डफळे, नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे, नागोजी माने, गणोजी शिर्के इत्यादी मोगलांकडील मराठा सरदारांना स्वराज्यात परत आणण्याचे काम केले. यातून त्यांची मुत्सद्देगिरी दिसते. नावजी बलकवडे, विठोजी करके, बहिर्जी घोरपडे, हणमंतराव निंबाळकर, गंगाजी बाबर, अमृतराव निंबाळकर, गिरजोरी यादव, कृष्णाजी सावंत, चांदोजी व नागोजी पाटणकर, बडोजी ढमाले, मकाजी देवकाते, नामाजी गायकवाड इत्यादी सरदार या काळात नावारूपाला आले. राजाराम महाराजांच्या काळात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे पराक्रमी सरदार उदयाला आले. त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य राजाराम महाराजांनी केले. 

राजाराम महाराजांनी जिंजीवरून महाराष्ट्रातील लष्करी मोहिमांसाठी वेळोवेळी आर्थिक मदत पाठवली. विशेषतः 1690 मध्ये एक लाख होनांचा खजिना त्यांनी रायगडाकडे पाठवला होता. स्वराज्याची अर्थव्यवस्था भक्कम असावी याकडे त्यांचे लक्ष होते. अर्थव्यवस्था, लष्करी यंत्रणा, प्रशासन यावर त्यांची उत्तम पकड होती. जिंजीच्या वेढ्यात असताना मोगलांचे संकट टाळण्यासाठी झुल्फिकार खानाबरोबर त्यांनी अंतःस्थ मैत्री प्रस्थापित केली, असे मार्टिन, तसेच इंग्रजांकडील नोंदींवरून दिसते. यातून त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा प्रत्यय येतो. याबाबतचे समकालीन संदर्भ डॉ. जयसिंगराव पवार यांनी त्यांच्या ग्रंथात दिले आहेत. 

राजाराम महाराजांनी कृष्णाजी अनंत सभासदांकडून "शिवचरित्र' लिहून घेतले. हा मराठी भाषेचा आणि शिवचरित्राचा ऐतिहासिक ठेवा आहे. राजाराम महाराजांनी महाराणी ताराबाईंना युद्धकला, राजनीतीचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे ताराबाईंनी मराठा साम्राज्याचे मोठ्या हिमतीने संवर्धन आणि संरक्षण केले. राजाराम महाराज हे पराक्रमी, निर्भीड, मुत्सद्दी, समंजस, धोरणी, प्रजावत्सल राजे होते. मोगलांशी कडवी झुंज देत स्वराज्याचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. तीन मार्च 1700 रोजी प्रकृतीअस्वास्थ्यामुळे त्यांचे सिंहगडावर निधन झाले. त्यांच्या प्रेरणादायी चरित्राचा अभ्यासपूर्ण परामर्श घेणारा शिवपुत्र छत्रपती राजाराम हा ग्रंथ आहे. 

Web Title Chatrapati Rajaram Maharaj third Chatrapati of Maratha Emprer

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com