चेंबूरच्या बीपीसीएल कंपनीच्या स्फोटात 43 जण जखमी ; माहुल-चेंबूरसह संपूर्ण सायन परिसर हादरला

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

चेंबूरच्या माहुलगाव येथील भारत पेट्रोलियमच्या प्लान्टमधील हायड्रो क्रॅकर युनिटमध्ये प्रचंड स्फोट होऊन भीषण आग लागली. या प्रचंड स्फोटामुळे माहुल-चेंबूरसह संपूर्ण सायन परिसर हादरून गेलाय. पाच ते सहा किलोमीटरपर्यंत स्फोटाचे आवाज ऐकू आल्यानं लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरलीय. या आगीत जीवित हानी झाल्याचं वृत्त नसलं तरी आगीत 43 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.

या शिवाय या आगीत कंपनीतील 200 ते 400 कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जातीय. आज दुपारी 3 वाजून 3 मिनिटांनी बीपीसीएलच्या हायड्रो क्रॅकर युनिटमध्ये ही भीषण आग लागली. आग लागल्यानंतर प्रचंड मोठे स्फोट झाले. भूकंप झाल्यासारखे धक्के जाणवल्यानं बाजूला असलेल्या माहुलगाव, गव्हाणपाडा आणि विष्णूनगर झोपडपट्टीतील लोकं घाबरून घराबाहेर पडले.

त्यानंतर लगेच धूर आणि आगीचे प्रचंड लोळ उठल्याने लोक आणखीनच हादरलं. आतापर्यंत दोनशे ते अडीचशे कामगारांना बाहेर काढण्यात आलंय...मुंबई अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन जवानांनी आग विझवण्याचं आणि कंपनीतील कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू केले आहेत. 

संबंधित बातम्या

Saam TV Live