'अभिनंदन यांना परमवीर चक्र द्यावे'- के. पलानीस्वामी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 मार्च 2019

चेन्नई: विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना "परमवीर चक्र' हा सर्वोच्च लष्करी सन्मान देण्याची मागणी तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

भारतीय हद्दीत घुसखोरी करणारे पाकिस्तानचे "एफ-16' विमान विंग कमांडर अभिनंदन यांनी पाडले होते. विपरीत स्थितीत दाखविलेल्या धैर्याबद्दल त्यांना हा सन्मान दिला जावा, असे पलानीस्वामी यांनी मोदी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान तमिळनाडूचे आहेत.

पाकिस्तानचे विमान पाडल्यानंतर अभिनंदन यांचे विमानही अपघातग्रस्त झाले आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले होते. यानंतर अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडले. अभिनंदन यांनी पॅराशूटच्या मदतीने उडी मारली होती पण ते पाकच्या तावडीत सापडले. पाकिस्तानच्या तावडीतून त्यांची साठ तासांनी सुटका झाली. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर आणि भारताने दिलेल्या हवाई हल्ल्याच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानवर जगभरातून दबाव वाढत होता. पाकिस्तानने त्यामुळे विनाअट अभिनंदन यांची सुटका केली.

अभिनंदन यांनी दाखवलेले शौर्य हे अतुलनीय आहे. पाकिस्तानला उत्तर देताना त्यांनी राष्ट्रहित हे एकच ध्येय समोर ठेवले. त्याचमुळे त्यांना लष्कराचा सर्वोच्च सन्मान अर्थात परमवीर चक्र देऊन गौरवण्यात यावे, अशी मागणी पलानीस्वामी यांनी पत्रात केली आहे.

Web Title : cm of tamil nadu e palaniswami writes to narendra modi requesting param veer chakra for wing commander abhinandan varthaman

संबंधित बातम्या

Saam TV Live