राज ठाकरेंना मतदानाला वेळ का लागला?, आयुक्तांनी मागविला अहवाल

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 जुलै 2019

नवी दिल्ली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुख्य निवडणूक आय़ुक्तांची दिल्लीत जाऊन भेट घेतल्यानंतर आता आयुक्तांना लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांना मतदान करण्यासाठी वेळ का लागला याचा अहवाल मागविला आहे.

राज ठाकरे यांना मतदानावेळी पुढे केवळ 20 मतदार रांगेत उभे असताना आपल्याला मतदान करण्यासाठी तब्बल दोन तास प्रतीक्षा करावी लागली, व्हीव्हीपॅटमुळे तसे घडले अशी तक्रार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली होती. यानंतर मुख्य निवडणूक आय़ुक्तांनी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबाबत खुलासा मागविला आहे.

राज ठाकरे यांनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतर मॅचच फिक्स असेल तर खेळून काय फायदा असे म्हटले होते. तसेच त्यांनी मतदानात पारदर्शकता आणि विश्वासार्हता आणण्यासाठी ईव्हीएमद्वारे मतदान घेण्याऐवजी पूर्वीसारखा मतपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणीही केली होती. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क, दादर येथील बालमोहन विद्यामंदिर या मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन मतदान केले होते.

Web Title: chief election commissioner report on Raj Thackeray voting

संबंधित बातम्या

Saam TV Live