वांद्रे प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला, म्हणाले 'आगीत तेल ओतण्याचे काम करु नका'

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 एप्रिल 2020

परप्रांतीयांची काळजी घेण्यासाठी सरकार सक्षम आहे. कुणीही उगीचच आग भडकावण्याचं काम करू नका असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना चांगलंच सुनावलं

महाराष्ट्रात विचित्र परिस्थिती नाही. देशात कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात असल्याने अनेकांना काळजी वाटत आहे. मात्र देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. एकट्या मुंबईत वीस ते बावीस हजार चाचण्या झाल्या आहेत. सरकार आत्मविश्वासाने परिस्थिती हाताळत असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. जनतेशी त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी परिस्थिती विषद केली.

पाहा काय आहे प्रकरण-

परप्रांतीयांची काळजी घेण्यासाठी सरकार सक्षम आहे. कुणीही उगीचच आग भडकावण्याचं काम करू नका असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना चांगलंच सुनावलंय. वांद्र्यातील परप्रातीयांच्या गर्दीवरून उद्धव ठाकरेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलंय. परप्रांतीयांची काळजी घेण्यासाठी सरकार सक्षम आहे. आतापर्यंत एकमेकांना जसं सहकार्य केलं तसच सहकार्य करा..ही राजकारण करण्याची वेळ नाही असही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. आपल्याकडे आगीचे बंब खूप आहेत. पण त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. सरकार योग्य पद्धतीनं काम करतंय असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलंय. 

तनिष्क मोरे या सहा महिन्याच्या बाळाच्या आईशी मी बोललो. सहा महिन्यांचे बाळ कोरोनावर मात करू शकते. त्यानंतर 83 वर्षांच्या आजींशी मी बोललो. त्यासुद्धा कोरोनावर मात करून घरी गेल्या. म्हणजे सहा महिने ते 83 वर्षांपर्यंत कोणीही या विषाणूंशी लढा देऊ शकतो. हे यातून दिसते. याशिवाय संजीव ओक यांच्या नेतृत्त्वाखाली टास्क फोर्स नेमला आहे. उपचाराची पद्धत आणि आरोग्यसेवा यावर ही टिम मार्गदर्शन करणार आहे.

कोरोनासोबतच आर्थिक संकटाशी सामना करण्यासाठी दोन गट तयार केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली हे गट करणार आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर, विजय केळकर, अजित रानडे या अभ्यासू मंडळींचा गट संकट निभावण्यानंतर काय करायचे, यावर मार्गदर्शन करणार आहे.  प्लाझमा उपचारासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. महाराष्ट्र या संकटावर मात करून देशाला दिशा दाखवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोठेही उणीव ठेवणार नाही.

शिवभोजन योजनेमध्ये 80 हजार लोकांच्या जेवणाची रोज करण्यात आली आहे. याशिवाय कोरोना योद्धा म्हणून निवृत्त परिचारिका, पोलिस यांना आवाहन केले होते. त्यासाठी 21 हजार जणांनी नोंदणी केली आहे. त्यांची छाननी सुरू केली आहे. बांद्रा येथे उत्तर प्रदेशातील मंडळींनी घरी जाण्यासाठी आंदोलन केले होते. त्याबद्दल त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुम्ही येथे सुरक्षित आहात, अशा शब्दांत त्यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र या विषयाला राजकारण करू नये. त्यांच्या भावनेशी खेळू नये, असा इशारा त्यांनी दिला. तसे केले तर कोणीही कायदेशीर कारवाईपासून वाचणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी इशारा दिला. आपल्याकडे आगीचे बंब भरपूर आहे. मात्र ही आग मी पसरवू देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सोनिया गांधी यांच्याशी मी बोललो आहे. शरद  पवार तर सोबत आहेत. त्यामुळे काळजी करू नका, असे त्यांनी आवर्जून सांगितले.   


संबंधित बातम्या

Saam TV Live