इमारतीचा स्लॅब कोसळल्यानं चिमुकलीचा मृत्यू

मोहिनी सोनार
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

मुंबई : इमारती पडण्याचं सत्र काही थांबतंच नाहीय. यामध्ये अनेक लोकांचे जीव गेले आहे आणि जातही आहेत. तरी सुद्धा यावर काही उपाय का होत नाही? हा मोठा प्रश्न पडला आहे. आता तर एका चिमुकलीला आपला प्राण गमवावा लागला आहे.

काल संध्याकाळी विरार पूर्वमधील कोपरी परिसरात जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला.. या घटनेत एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.. तर, 30 ते 40 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलय.. संध्याकाळी अचानक इमारतीच्या चौथ्या मजल्याचा काही भाग तिसऱ्या मजल्यावर अचानक कोसळला..आणि यातच ही दुर्दैवी घटना घडली आहे. यात काही वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान अग्निशामक दल आणि पोलिसांकडून बचावकार्य सुरु होते. मात्र त्या चिमुकलीला वाचवण्यात यश आलं नाही.

हे सत्र असंच सुरु राहिलं तर आणखी अनेक जीव जाण्याची भिती आहे. मात्र ठिप्प प्रशासन झोपेतंच आहे. आणखी किती जाव घेतल्यावर जाग येईल, ते सांगणं कठीण आहे.  

Web Title -  child death due to building collapse

संबंधित बातम्या

Saam TV Live